Ad will apear here
Next
लॉकडाउनमध्ये मोडी लिपी शिका ऑनलाइन.. तेही मोफत..!
करोना विषाणूमुळे ओढवलेल्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या हातात भरपूर वेळ निर्माण झाला. प्रत्येकाने आपापल्या परीने त्या वेळाचा सदुपयोग करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. काही जण वेगवेगळे ऑनलाइन कोर्सही करत आहेत. अशाच पद्धतीने घरबसल्या मोडी लिपी शिकण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. 

गडहिंग्लज येथील घाळी कॉलेजच्या मराठी विभागाने मोडी लिपी प्रशिक्षणाचा ऑनलाइन कोर्स आयोजित केला आहे. डॉ. नीलेश केदारी शेळके यांनी मोडी लिपीचा हा कोर्स डिझाइन केला आहे. त्यांच्या पहिल्या बॅचला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दुसरी बॅच २० एप्रिल ते २७ एप्रिल २०२० या कालावधीत होणार आहे. त्या बॅचला प्रवेश घेण्यासाठीची लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे. (२० एप्रिल रोजीच्या ताज्या माहितीनुसार ही दुसरी बॅचही फुल झाली असून, पुन्हा असे कोर्स कधी होणार आहेत, याच्या माहितीसाठी बातमीच्या शेवटी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.)

‘या कोर्सला कोणतीही फी नाही. आपल्या सोयीनुसार आणि वेळेनुसार शिकता येईल. कोर्स सुरू झाला, की दररोज सकाळी सातपूर्वी व्हिडिओची लिंक पाठवली जाईल. सहभागी व्यक्तींनी दिवसभरात सोयीने कधीही तो पाहून शिकायचे आहे. कोर्सची परीक्षाही घरातूनच द्यायची आहे,’ अशी माहिती डॉ. नीलेश शेळके यांनी दिली. 

इतिहास काळातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे मोडी लिपीत लिहिलेली आहेत. त्यामुळे या कागदपत्रांच्या अभ्यासासाठी मोडी लिपी येण्याची आवश्यकता असते. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली मोडी लिपी घरबसल्या शिकण्याची संधी या कोर्सच्या निमित्ताने चालून आली आहे. 

प्रवेशासंदर्भात माहितीसाठी संपर्क : 
डॉ. नीलेश केदारी शेळके ९११२३ ४५१४८, ९४२११ १२४५५
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZRUCL
Similar Posts
तुम्ही मराठीतील ‘हे’ शब्द लिहिताना चुकता का? मराठी भाषा बोलताना, लिहिताना रोजच्या वापरातल्या अनेक शब्दांचे लेखन अनेकांकडून अनेकदा अयोग्य पद्धतीने केले जात असल्याचे दिसते. अनेक मराठी घरांमध्ये एकही मराठी शब्दकोश नसतो. असला तरी त्यात शब्दांचे योग्य-अयोग्य लेखन पडताळून न पाहता केवळ अनुकरण करण्याची सवय वर्षानुवर्षे चालत आली आहे. परंतु एखादी गोष्ट वर्षानुवर्षे चुकीची केली म्हणून ती बरोबर ठरत नसते
बोलू ‘बोली’चे बोल! - घाटी बोली (व्हिडिओ) २०१९ या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. त्या मालिकेत आजचा व्हिडिओ घाटी बोलीचा
‘अभिजात मराठी’साठी... मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न सुरू आहेत. आज मराठी राजभाषा दिन साजरा करत असताना या बाबीचा उल्लेख होणे ओघानेच येते. यासाठी राज्य सरकारतर्फे तयार करण्यात आलेल्या रंगनाथ पठारे समितीचे समन्वयक प्रा. हरी नरके यांनी याविषयी मूलभूत काम केले आहे. त्यांनी ‘अभिजात मराठी’बद्दल दिलेली ही माहिती
वेडात मराठे वीर दौडले सात - नेसरीची लढाई तो दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४. राज्याभिषेकापूर्वी काही महिने शिवाजी महाराज पन्हाळगडावर होते. याच काळात आदिलशाहीचा सरदार बहलोलखान हत्ती-घोड्यांसह वीस हजार सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. याची खबर लागताच प्रतापराव गुजर आणि इतर मान्यवर सरदारांना छत्रपती शिवाजीराजांनी गडावर बोलावले आणि आज्ञा दिली, की ‘खान वळवळ भारी करतो, त्यास मारोन फते करणे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language